धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ७७ वा वर्धापन दिन १७ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. धाराशिव येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.तत्पूर्वी श्री.सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करतील.या मुख्य ध्जवारोहण कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.