धाराशिव (प्रतिनिधी)- अतिरिक्त पावसामुळे सिंदफळ साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होण्याची मोठी शक्यता आहे. परिसरातील सर्व शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सिंदफळ येथील पाणी उचलून तुळजाभवानी मातेच्या चरणी रामदरा तलावात साठवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. रामदरा तलावाची साठवण क्षमता 25 दलघमी एवढी आहे. आणि सध्या तलावात केवळ 7 ते 8 दलघमी एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे सिंदफळ तलावातील वाहून जाणारे पाणी लिफ्ट करून रामदरा तलावात भरण्याचे काम सध्या सुरू आहे.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत मराठवाड्याच्या हक्काचे पाणी देखील याच प्रकारे रामदरा तलावात लवकरच घेणार आहे. त्याचे टेस्टिंग यानिमित्ताने झाले आहे.