धाराशिव (प्रतिनिधी)- श्री. लक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था, बेंबळी यांच्या वतीने गरजू महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने १५१ शिलाई मशीनचे टप्प्याटप्प्याने वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून नंदकुमार मानाळे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्या भाजप नेत्या विद्या माने, अमृता रणदिवे, सुलक्षणा उपाशे व संस्थेच्या सचिव साधना मानाळे यांनी उपस्थित राहून महिलांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना संदश भारती मानाळे म्हणाले की, “रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि महिलांना स्वावलंबी बनवणे हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. महिलांनी शिवणकाम शिकून कपडे, पिशव्या तयार करून शाश्वत उत्पन्नाचे साधन निर्माण करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमामुळे परिसरातील महिलांना आत्मनिर्भरतेची नवी दिशा मिळाली असून उज्ज्वल भवितव्य घडवण्याचा आत्मविश्वास लाभला आहे. सुनिता तानवडे, अंजना महामुनी, प्रगती दूधभाते, अनीता तानवडे, सुनंदा डावकरे, प्रतीक्षा सोनटक्के, कांता खराडे, अनीता करजखेडे, ललिता वाघमारे, ऋतुजा गुरव, सुमन भोरे, अर्चना राऊत, इंदुबाई भिसे, सोनाली रोकडे आदींसह सर्व १५१ महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.