तुळजापूर (प्रतिनिधी) - येथीलल अँड. जनक धनंजयराव कदम पाटील यांची केंद्र सरकार करीता स्थायी सरकारी वकील. धाराशिव जिल्हा करीता नियुक्ती केली आहे आपल्या कार्यकौशल्यामुळे अल्पावधीतच महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवर हे स्थान मिळवले आहे.
ते भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान, सोलापूर (महाराष्ट्र राज्य) चे विश्वस्त असून, सामाजिक कार्यातही सक्रिय भूमिका बजावत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीयकृत, अनुसूचित तसेच मल्टीस्टेट बँकांच्या पॅनेलवर कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे. केंद्र सरकारकडूनही त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला असून, ऍड. जनक पाटील यांची धाराशिव जिल्ह्यासाठी अतिरिक्त स्थायी सरकारी वकील (Additional Government Standing Counsel) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्त्यांमुळे तुळजापूर व धाराशिव परिसरातील कायदेविषयक क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले असून, त्यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.