धाराशिव (प्रतिनिधी)-डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात " केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे" यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डाॅ. प्रशांत दीक्षित यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उपस्थित सर्वांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. या प्रसंगी शैक्षणिक विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.