धाराशिव (प्रतिनिधी)-  अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे सरसकट पंचनामे करुन ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच शेतकयांना हेक्टरी 50 हजाराची आर्थीक मदत करण्यात यावी, अशी मागणी राष्टवादी शरचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी बुधवारी (दि.17) निवेदनाद्वारे पालकमंत्री  तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.

या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले की, धाराशिव जिल्ह्यात दर तीन वषार्नंतर कोरडा दुष्काळ पडतो. परंतू यावर्षी 14 ते 30 मे 2025 या कालावधीत 163 मी.मी. पाऊस जिल्ह्यामध्ये पडला. व त्यानंतर 1 जून ते 13 सप्टेंबर 2025 या कालावधीत कळंब, धाराशिव, वाशी, लोहारा, उमरगा, भुम, परंडा व तुळजापूर या भागामध्ये भाग बदलत अतीवृष्टी झाली त्यामुळे नदी,नाले ओढे तलाव या बाजुच्या जमीनी खरडून वाहुन गेल्या. जिल्ह्यामध्ये जवळपास 2 लाख 50 हजार हेक्टर च्या वरती म्हणजेच 75 टक्के शेती पीकाचे नुकसान झालेले आहे. या महिन्यामध्ये तीन व्यक्ती व 316 जनावरे मृत्युमुखी पडलेले आहेत. जवळपास 350 घरांची पडझड झालेली आहे. 500 पेक्षा च्या वरती गावातील शेती बाधीत झालेली आहे.अशा परिस्थितीत पावसाचे आणखी पंधरा दिवस शिल्लक असून जिल्ह्यात सर्वदूर मोठा पाऊस पडत आहे.

जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पीकांचे नुकसानीचे पंचनामे चालु आहेत. परंतू सध्या पावसाची परिस्थिती बघता सरसकट पंचनामे करुन ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत करणेसंदर्भात आपण शासन दरबारी ही भुमीका अग्रही मांडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पडलेल्या आसमानी संकटाला मदत करण्यासंदर्भात कणखर भुमीका घ्यावी. तसेच जिल्ह्यात वीज पडून अनेकांचे मृत्यू होत असल्याने जिल्हामध्ये वीजरोधक यंत्रणा बसण्याित यावी, जिल्ह्यात खराब रस्ते असल्याच्या नावाखाली ग्रामीण भागात अनेक बस बंद केल्यामुळे सर्वसामान्य नागरीकांच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या बस तात्काळ सुरु कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी नामदेव चव्हाण, बालाजी डोंगे, इकबाल पटेल, अनिल जाधव, पाटील आदींची उपस्थिती होती.

 
Top