उमरगा (प्रतिनिधी)- येथील गटशिक्षण कार्यालय पंचायत समिती उमरगाच्या वतीने तालुका शिक्षक पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात जिल्हा परिषद प्रशाला उमरगा येथे संपन्न झाला. उमरगा व लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष केशव पाटील माजी जि.प.उपाध्यक्ष हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संचालक डॉ. कलिमोद्दीन शेख, प्रमुख पाहुणे डॉ.दयानंद जटनुरे प्राचार्य डायट धाराशिव, डॉ.बिराप्पा शिंदे अधिव्याख्याता डायट, संजय पवार, भगवान जाधव, मुख्याध्यापक पद्माकर मोरे उपस्थित होते. कार्यक्रमांची सुरुवात राज्यगीताने करण्यात आली त्यानंतर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप्रज्वलन करून करण्यात आली, प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी अमोल रजपूत यांनी केले.
उकृष्ठ कार्य करणाऱ्या तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून एक, राहुल रामकिसन कांबळे, धैर्यशील भालचंद्र भोसले, सुधावाणी महेश कडगंचे, परमेश्वर मधुकर शिंदे, लक्ष्मण बाबुराव काळे, उर्मिला दत्तात्रय मुसळे, कल्पना बाबुराव गोरे, संगीता चंद्रकांत डोकडे, संगीता माणिकराव राठोड, सोनाली विजयकुमार कलशेट्टी, प्रशांत सुरेशराव पाटील, कालिंदा शंकरराव डिगरे अश्या शिक्षकांना तालुका शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक संचालक डॉ.शेख यांनी सामान्य व गोरगरीब समाजासाठी जि.प. शाळा व मराठी शाळा टिकल्या पाहिजेत या शाळेतील विद्यार्थी अनेक उच्च पदापर्यंत पोहचले आहेत. तसेच शिक्षण व व्यवस्थेविषयी सविस्तर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पलता पांढरे व धनराज फुरडे यांनी केले. तर आभारप्रदर्शन वि.अ. शेषराव कदम यांनी केले.