भूम (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या राज्य परिषद सदस्य पदी बाळासाहेब क्षिरसागर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा भूम तालुका भाजपच्यावतीने मोठा सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत .
राज्यात अनेक निष्ठावंत ज्येष्ठ भाजपच्या अधिकारी नेते मंडळींची राज्य परिषद सदस्य पदी निवड झाल्याची यादी जाहीर करण्यात आली, यामध्ये परंडा विधानसभा अध्यक्ष असलेले बाळासाहेब क्षिरसागर यांचीही निवड झाल्याचे दिसून आले , त्या अनुषंगाने त्यांचा आज शुक्रवार दिनांक 11 जुलै 2025 रोजी तालुका भाजपच्यावतीने पक्ष कार्यालयात मोठा सत्कार केला .
बाळासाहेब क्षिरसागर हे गेल्या 35 वर्षापासून भाजपशी एकनिष्ठ राहून, पक्षाच्या ध्येय धोरणानुसार पक्ष संघटनात्मक काम करत आहेत, त्यांना पक्षश्रेष्ठींनी जवळपास 8 राज्यात देखील महत्त्वपूर्ण जबाबदारी गेल्या काही वर्षांपूर्वी दिलेली होती, ती त्यांनी पार पाडलेली आहे, सध्याही त्यांच्याकडे परंडा विधानसभा अध्यक्षपद आहे, त्यांचा एकनिष्ठपणा, अनुभव विचारात घेता आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षश्रेष्ठीने राज्य परिषद सदस्य पदी निवड करून मोठी जबाबदारी दिली आहे, याचा निश्चितपणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांना मोठा आधार मिळणार आहे.
भाजप पक्ष कार्यालयात त्यांचा तालुक्याच्यावतीने मोठा सत्कार केलाफ यावेळी तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील, महादेव वडेकर, शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, आबासाहेब मस्कर, हेमंत देशमुख, प्रदिप साठे, संदिप खामकर, सिद्धार्थ जाधव, आकाश शेटे, सुबराव शिंदे, विधीज्ञ संजय शाळू, चंद्रकांत गवळी, प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, राम भारती, सौ विद्या खामकर, सौ उषाताई आसलकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गाढवे, दीपक खराडे, जयेंद्र मैंदरगे, डिसले, वडेकर, मुंडेकर यांनीही त्यांचा सत्कार केला.