भूम (प्रतिनिधी)- कैलासवासी विलासराव रोकडे फाउंडेशन संचलित स्वस्त मानस व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र भूम या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 20 रक्तदात्यांनी रक्तदान केले व गुरुपौर्णिमा हा उत्सव केंद्रामध्ये साजरा करण्यात आला.
या ठिकाणी प्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये कार्यक्रमासाठी आलेल्या गुरूंचे पाद्यपूजन करण्यात आले. त्यामध्ये हरिभक्त पारायण अरुण शाळू महाराज योग गुरु संजीवन सातपुते सर व ओम शांतीचे ब्रह्मकुमारी राजश्री दीदी त्यानंतर वरील सर्वांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी शाळू महाराज यांनी आई वडील यांनी आपल्या वरती केलेले संस्कार आणि आपल्या मनामध्ये असलेल्या वाईट गोष्टींना स्थान न देता आपले आरोग्य सदृढ आणि निरोगी सगळ्यांसाठी व्यसनमुक्त होणे ही काळाची गरज आहे हे विचार पटवून दिले. त्यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केंद्राचे डायरेक्टर नवनाथ रोकडे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन काउंसलर विनोद वाघमारे यांनी केले. तसेच विशाल नलवडे, कमलेश डामरे, संदीप निमटके, शुभम अवसारे यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.