धाराशिव (प्रतिनिधी)- नूतन प्राथमिक विद्यामंदिर, धाराशिव निसर्ग व मातृप्रेम या दोन्हींची संगती साधणारे “एक पेड माँ के नाम“ हे अभियान नूतन प्राथमिक विद्यामंदिर,धाराशिव  यांच्यावतीने आयोजित करण्यात आले. या उपक्रमात प्रत्येक सहभागी व्यक्तीने आपल्या आईच्या सन्मानार्थ एक झाड लावण्याचा संकल्प केला.

या अनोख्या अभियानाचे उद्दिष्ट केवळ वृक्षारोपण नव्हे, तर वृक्षांचे पालनपोषण करून त्यांच्यामध्ये आईच्या मायेचा अनुभव घेणे आहे. झाडे जशी आपल्याला सावली, हवा आणि जीवनदायी ऊर्जा देतात, तशीच माया आपल्याला आपल्या आईच्या रूपात मिळते. या भावनेला अनुसरून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशाला चे मुख्याध्यापक श्री.प्रदीप कुमार गोरे, पालक प्रतिनिधी म्हणून नानासाहेब नलावडे  यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात मातृत्वाचे महत्व आणि पर्यावरण रक्षणाचे आजच्या काळातील अपरिहार्यता यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रकारची झाडे लावली  विशेषतः फळझाडे, औषधी वनस्पती आणि स्थानिक पर्यावरणाला पोषक वृक्ष.

या अभियानाला शाळेमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय जाधव, राम मुंडे , यमुना जाधवर, तृप्ती तिकोने, चित्रा सोनटक्के, दिपाली सुरवसे, गोपाल पौळ, शिवराज खोबरे इ. सहभागींनी एकपेडमाँकेनाम या हॅशटॅगसह आपल्या आईच्या नावाने लावलेल्या झाडांचे फोटो शेअर करून इतरांनाही प्रेरणा दिली आहे.  नूतन प्राथमिक विद्यामंदिर यांच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपणही आपल्या आईच्या  सन्मानार्थ एक झाड लावा आणि त्याचे संगोपन करून पर्यावरण रक्षणाच्या दिशेने पाऊल उचलावे.

 
Top