धाराशिव (प्रतिनिधी)- येथील नगरपरिषद मध्ये सफाई कामगार म्हणून कंत्राटी रोजगारावर काम करणारी महिला मंगल मेसु गवळीचे दि. 25 जून रोजी खाजा नगर येथे स्वच्छता करीत असतांना एका कारने उडविल्याने त्या सफाई कामगार महिलेचा दुर्दैवी अंत झाला. या महिलेस नगर परिषद प्रशासनाच्या वतीने तिच्या एका वारसाला शासकीय सेवेत कायमस्वरुपी नियुक्ती देऊन आर्थिक मदत द्यावी. अशा प्रकारची मागणी नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या कडे सामाजिक कार्यकर्ते तथा शहर उपजीविका आराखडा कृती समिती सदस्य गणेश वाघमारे यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मंगल गवळी रा.बेंबळी येथुन दररोज धाराशिवला रोजगारासाठी येणे जाणे करीत होत्या. त्यांची आई आजारी असून तिचा सांभाळ याच करीत होत्या. त्यांना दोन अपत्य आहेत. ही महिला कंत्राटी कर्मचारी म्हणून रोजंदारीवर असली तरी तिचा रस्त्यावरती अपघाती मृत्यू झाला असल्याने शासनाच्या वतीने तिच्या वारसांना मदत मिळणे गरजेचे आहे. पंढरपूरची वारी असेल या इतर धार्मिक कार्यक्रमामध्ये मृत्यू पावलेल्या वारकरी,भक्तास शासनाकडून आर्थिक मदत मिळते, तसेच कंत्राटी कामगार ज्या टेंडर धारक कंपणी तथा गुत्तेदार यांच्या कडे काम करीत असताना त्या कामगारांना विमा संरक्षण देणे गरजेचे असुन संबंधित कार्यालयाची जबाबदारी आहे की अस्थाई कामगार असेल या स्थाई कामगार त्यांच्या हिताच्या कायदेशीर बाबीची पडताळणी करणे व संबंधित गुत्तेदारांना त्या करण्यास सांगणे,मयत महिला मंगल मेसु गवळी यांच्या वारसांना त्यांच्या कडुन ही मदत मिळाली पाहिजे.अशा प्रकारचे लेखी निवेदन गणेश रानबा वाघमारे सामाजिक कार्यकर्ता तथा सदस्य, नगर परिषद शहर उपजीविका आराखडा कृती समिती धाराशिव यांनी मुख्याधिकारी नगर परिषद यांच्याकडे निवेदन द्वारे केली असुन याची प्रत जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आली आहे.