तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथे आषाढी ऐकादशी सोहळा पारंपरिक पध्दतीने भक्तीभाव  मय वातावरणात संपन्न झाला. आषाढी एकादशी निमित्ताने मंदीरांमध्ये किर्तन भजन कार्यक्रम संपन्न झाले. आषाढी ऐकादशी निमित्ताने श्रीतुळजाभवानी मंदीर व कासार गल्लीतील श्रीविठ्ठल रुकमीणी दर्शनार्थ भाविकांनी गर्दी केली होती.  


पंढरीचे भाविक तुळजाई नगरीत दाखल 

आषाढी एकादशीची वारी पुर्ण केल्यानंतर हजारो वारकरी सांयकाळी श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ तिर्थक्षेञ तुळजापूर येथे दाखल झाल्याने वारकरी भाविकांनी तुळजाई नगरी गजबजुन गेली होती. आषाडी एकादशी पार्श्वभूमीवर उपवास पदार्थांमध्ये वाढ दिसुन आली.

 
Top