धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था व बँकांच्या वसुली अधिकारी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन आदर्श महिला पतसंस्थेचे संस्थापक हणुमंत भुसारे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्टेट इलेक्ट्रिसिटी सोसायटीचे चेअरमन सुरवसे हे होते.
धाराशिव येथे स्टेट इलेक्ट्रिसिटी सोसायटीच्या सभागृहात जिल्ह्यातील सहकारी बँका व पतसंस्थांच्या विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन शनिवारी (दि.19) करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहकार कायदे तज्ञ आर. बी. यादव (मुळे), श्रीकांत साखरे, विक्रम पाटील, सहायक निबंधक अंबिलपुरे, धनंजय रणदिवे, विष्णू इंगळे, जिल्हा सहकार विकास अधिकारी एम. एल. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. दिपप्रज्वलनाने प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक सहकार विकास अधिकारी जाधव यांनी केले. या प्रशिक्षण वर्गास जिल्हाभरातील सहकारी बँका, पतसंस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक, शाखाधिकारी, वसुली अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 3 दिवस हे प्रशिक्षण वर्ग चालणार आहेत.