तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरसह परिसरास बुधवार दि. 9 जुलै रोजी सांयकाळी प्रदीर्घ कालावधीनंतर सुमारे पंधरा मिनीटे मुसळधार पावसाने झोडपुन काढले. तुळजापूर तालुक्यात पेरणी नंतर पावसाने प्रदीर्घ काळ ओढ दिल्याने हलक्या रानांमधील पिके माना टाकण्याचा अवस्थेत होते. तर पावसाने ओढ दिल्याने पिकांवर रोग पडत होते. माञ अखेर बुधवारी राञी मुसळधार पावसाने झोडपुन काढल्याने पिकांना जीवदान मिळाले. पाऊस मुसळधार पडल्याने पिकांवरील जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.