तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या प्रवर्गातील महिला आरक्षणासाठी सोडत काढण्याची प्रक्रिया गुरुवार
दि १० रोजी दुपारी ०४.०० वाजता पंचायत समिती सभागृहात संपन्न होणार आहे,
या सोडतीसाठी मा. जिल्हाधिकारी धाराशिव यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी, मा. उपविभागीय अधिकारी, धाराशिव यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडेल.
सर्व संबंधित ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, इच्छुक नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.तहसिलदार अरविंद बोळगे यांनी केले आहे.
मुंबई महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम, १९६४) मधील नियम २-अ च्या पोटनियम (१) व (२) आणि ग्रामविकास विभाग, मुंबई यांची अधिसूचना (असाधारण क्र. २१३, दिनांक १३ जून २०२५) नुसार धाराशिव जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या ३ जुलै २०२५ च्या आदेशानुसार, २०२५ ते २०३० या कालावधीसाठी तालुकास्तरावर सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.