परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुका मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या सौजन्याने करिअर मार्गदर्शन व रोजगार मेळावा शनिवार  दि.12 जुलै रोजी  शहरातील राजधानी फंक्शन हॉल येथे घेण्यात आला.

बेरोजगार युवकांना तांत्रिक शिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्दिष्टाने हा मेळावा घेण्यात आला. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या सौजन्याने इच्छुक बेरोजगार युवकांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांना नोकरीची संधीही त्यांच्या पुढाकाराने देण्यात येईल असे फाउंडेशनने सांगितले.

त्याचबरोबर ज्या बेरोजगार युवकांना रोजगार मेळाव्यास येता आले नाही अशांनी देखील मराठा सेवा संघ परंडा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यामार्फत मोफत प्रशिक्षणासाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्याकडे संपर्क करावा. असे आवाहन करण्यात आले.

 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सतीश पाटील होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक दिलीपकुमार पारेकर उपस्थित होते . तसेच जि .प.माजी सभापती नवनाथ जगताप, जिजाऊ ब्रिगेड प्रदेश सहसचिव आशा मोरजकर, नवनाथ खैरे, देवानंद टकले, अंगद धुमाळ, रविंद्र मोरे, मनोज कोळगे, राजकुमार देशमुख आदि उपस्थित होते.प्रथम फाउंडेशन यांच्यावतीने संतोष गोंजुटे, बाळासाहेब पाचंगे, दिनेश धुळे, बालाजी भालेराव, सुमित कोथिंबीरे, सोमनाथ घोडके यांनी मार्गदर्शन केले. मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष गोरख मोरजकर, राहूल रणदिवे, सचिव महेश शिंदे व संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष, सुहास ठोंगे आदिंनी या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

 
Top