परंडा (प्रतिनिधी)- रस्त्यावर उभ्या असलेल्या कारची काच फोडून आत ठेवलेली 1 लाख 30 हजार रुपयांची रक्कम चोरीस गेल्याची घटना तालुक्यातील सोनारी येथे घडली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे चिंचपूर (खु.) येथील शत्रुघ्न गरड हे दि.10 जुलै रोजी परंडा येथून चिंचपूरकडे निघाले असता सोनारी येथे काही वेळासाठी एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी एका अज्ञात इसमाने कारची काच फोडून आत ठेवलेली सुमारे 1 लाख 30 हजार रुपयांची रोख रक्कम पळवली. या प्रकरणी फिर्यादी शत्रुघ्न गरड यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भुम तालुक्यातील अंबी पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.