भूम (प्रतिनिधी)- राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील भूम आगाराला सगळ्यात उशिरा पाच -पाच नवीन एसटी बसेस अशा एकूण दहा एसटी बसेस दिल्या. परंतु टाटा कंपनीच्या आठ एसटी बसेस वापस मागून घेतल्या आहेत.
भूम आगाराचा विस्कटलेला कारभार दहा नवीन एसटी बसेस आल्यानंतर लांब पडल्याच्या गाड्या सुरळीत होत नाही तोच राज्य परिवहन महामंडळाने टाटा कंपनीच्या आठ गाड्या सातारा विभागांमध्ये मागून घेतल्या आहेत. त्यामुळे मध्यम पल्यांच्या जाणाऱ्या या गाड्या मागून घेतल्यामुळे सध्या एसटी बसेसचे नियोजन लावताना आगर प्रमुखांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या आठ गाड्या गेल्यामुळे मध्यम पल्ल्याच्या ठिकाणी पुणे,बीड,अक्कलकोट, धाराशिव,सोलापूर यासह आसपास ग्रामीण भागामध्ये या गाड्यांमुळे प्रवासांना जाण्या येण्यास मदत होत होती.नवीन दहा गाड्या दिल्यामुळे भूम आगारातून लांब पडल्याच्या गाड्याचा प्रश्न मार्गी लागला असताना आगारातून सर्व फेऱ्या सुरळीत असताना या जाणाऱ्या आठ गाड्यांमुळे एसटीच्या फेऱ्यांचे नियोजन थोड्याफार प्रमाणात कोलमडत आहे. राज्य परिवहन महामंडळाने भूम आगारास आणखीन दहा नवीन बसेस मिळाव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून होतात.