धाराशिव (प्रतिनिधी)- ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य या संघटनेचे दोन दिवसीय अधिवेशन 19 व 20 जुलै रोजी आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाची सांगता रविवार दिनांक 20 रोजी झाली. या अधिवेशनाची सांगता रविवारी राज्याचे अध्यक्ष डॉ विजय लाड यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाली. 

यावेळी डॉक्टर लाड म्हणाले की,   “संघटना आहे म्हणून आपण आहोत, संघटनेमुळेच आपले अस्तित्व आहे,“ हे कार्यकर्त्यांनी नेहमी लक्षात ठेवावे, असे ठाम मत व्यक्त केले. तसेच  राज्य सचिव  अरुण वाघमारे यांनी ग्राहक संरक्षण परिषद सदस्यांची जबाबदारी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी परिषदेमधील कक्ष अधिकारी व कार्यकारी अधिकाऱ्यांची कार्यनिश्चिती, तसेच खत किंवा भाजीपाला मंडळातील तक्रारी कशाप्रकारे कराव्यात, याविषयी अभ्यासपूर्वक मार्गदर्शन केले.  यावेळी भुम नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांचा ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्याध्यक्ष डॉक्टर विजय लाड, राज्यसचिव अरुण वाघमारे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी राज्य संघटक सर्जेराव जाधव, सहसंघटक मेधाताई कुलकर्णी, राज्य कोषाध्यक्ष श्रीमती सुनीता घाटगे, राज्य सहसचिव प्राध्यापक एस एन पाटील, राज्य सदस्य प्रमोद कुलकर्णी, मराठवाडा विभागाध्यक्ष सतीश माने, विभाग संघटक हेमंत वडणे व बालाजी लांडगे, जिल्हाध्यक्ष अजित बागडे यांच्यासह मान्यवर हजर होते.19 व 20 जुलै ला दोन दिवसीय भव्य अधिवेशन प्रथमच आयोजित करण्याचा बहुमान धाराशिव जिल्ह्याला मिळालेला होता. या आयोजित करण्यात आलेल्या  राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये  स्नेह मेळावा,चर्चासत्र, प्रबोधन, तज्ञांचे मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे संवाद उपक्रम, गुणवंत, यशवंतांचां गौरव, सहभागी सर्वांना प्रमाणपत्र, ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या माध्यमातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या सेवेची माहिती, मनोगते, आढावा आणि भविष्यातील सेवा कार्याचे नियोजन या विषयावर राज्यातील 26 जिल्ह्यातील 600 साधकांना मार्गदर्शन करण्यात आले.  संघटनेचे वतीने राज्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या श्रमिक प्रवर्गातून हेमलता वडनेर नाशिक विभाग, उद्योजक प्रवर्गातून विलासराव काळोखे, पुणे विभाग शेतकरी प्रवर्गातून संजय शिगवण, कोकण विभाग व्यापार निर्मिती प्रवर्गातून शीतल इंदापूरकर मराठवाडा विभाग ,ग्राहक प्रवर्गातून निलेश घोंगडे नागपूर विभाग या पाच साधकांना पंचप्राण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या देविदास नंदनवार, किरण बोळे ,प्राध्यापक बी एम भामरे, आनंद कृष्णापुरकर व रत्नाकर कोळंबकर  या पाच साधकांना  उत्कृष्ट कार्यकर्ता हा विभागवार पुरस्कार देण्यात आला.  या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कांबळे, जिल्हा सचिव आशिष बाबर, कोषाध्यक्ष शरद वडगावकर, संघटक रवी पिसे, सह संघटक प्राध्यापक पूनम तापडिया व विशाल शिंदे यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

 
Top