धाराशिव (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने जिल्हा परिषद प्रशाला शाळा, वाघोली येथे भक्तिभावाने पारंपरिक वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेत टाळ, मृदंग व अभंगगायनाच्या गजरात उत्साहाने सहभाग घेतला.

'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषात गावातील रस्त्यांवरून पांडुरंगाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी रंगवलेल्या फुलांनी व पताकांनी पालखीची सुंदर सजावट केली होती. ग्रामस्थ व पालकांनीही या भक्तिमय उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मुख्याध्यापक उद्धव माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की, “वारकरी संप्रदायातून मिळणाऱ्या सांस्कृतिक व आध्यात्मिक मूल्यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, या हेतूने ही दिंडी आयोजित केली आहे.

कार्यक्रमाची सांगता हरिपाठ व अभंग गायनाने झाली. यावेळी माने यु.सी, कवडे एस.एम, एलगुडे एस.एन, धाबेकर आर.एच, शिंदे डी.एस. खडबडे पी.एस, माळी.एस.टी. चव्हाण.पी.आर, पूनम काकडे यांचा समावेश होता. पालकवर्गाने देखील मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने हा उत्सव संस्मरणीय ठरला.


 
Top