तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांनी अभिजीत अमृतराव या आरोपीला अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने फरार आरोपी अभिजीत अमृतराव याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अभिजीत अमृतराव हा सेवन गटातील आरोपी आहे. ड्रग्ज तस्करीत 38 आरोपी असुन त्यातील 13 आरोपी फरार आहेत. तर 3 जणांना जामीन मिळाला असुन 22 आरोपी हे धाराशिव येथील जिल्हा कारागृहात आहेत.