धाराशिव (प्रतिनिधी)- शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त दिनांक 27 रोजी विशेष भेट देण्यात आली.
धाराशिव जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख शंकरराव बोरकर आणि बोरीवली मुंबई शाखा 17 च्या महिला शाखा संघटक कु. स्वाती बोरकर यांनी उद्धव ठाकरे साहेबांना त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीत त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मन:पूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली असून बोरकर परिवाराने शिवसेनेच्या कार्याबाबत आपली निष्ठा पुन्हा एकदा व्यक्त केली. या भेटीद्वारे ठाकरे साहेबांवरील शिवसैनिकांचा प्रेमभाव आणि कार्याप्रती असलेली निष्ठा अधोरेखित झाली.