धाराशिव (प्रतिनिधी)- बालकांचे हक्क, बालविवाह, बालश्रम, बालभिक्षा यासारख्या गंभीर सामाजिक समस्यांवर प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी परंडा येथे जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा 25 जुलै 2025 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजता या वेळेत पंचायत समिती,परंडा सभागृह येथे होणार असून,युवा ग्राम विकास मंडळ धाराशिव व महिला व बाल विकास कार्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

युवा ग्राम विकास मंडळ धाराशिव ही संस्था सन 1985 पासून धाराशिव, बीड,सोलापूर,लातूर व इतर जिल्ह्यांमध्ये महिला सबलीकरण, बालहक्क,पिण्याचे पाणी,शेती, स्वच्छता,प्राणीकल्याण आदी क्षेत्रात कार्यरत आहे. संस्था Just Right for Children या देशव्यापी बालहक्क कार्यक्रमाअंतर्गत  Aspirational District Dharashiv मधील परंडा तालुक्यात कार्यरत आहे.

या कार्यक्रमांतर्गत परंडा तालुक्यातील असुरक्षित कुटुंबांना शासकीय योजनांशी जोडणे, बालविवाहमुक्त तालुका घडवणे, तसेच बाल अत्याचार,बालश्रम, बालभिक्षेचे निर्मूलन यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कार्यशाळेद्वारे जिल्हास्तरीय अधिकारी,सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था यांना या विषयांवर प्रशिक्षण देऊन प्रभावी अंमलबजावणीची दिशा दिली जाणार आहे.

 
Top