तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे येत्या दोनच महिन्यात सि. टी. स्कॅन सुविधा उपलब्ध होणार आहे. सि. टी. स्कॅन जागेचे काम प्रगतीपथावर आहे. पुणे येथील कृष्णा डायगनोस्टिक ही प्रसिद्ध डायगनोस्टिक कंपनी याचे काम पाहणार आहे. उपजिल्हा रुग्णालय मध्ये उपचार घेणाऱ्या पेशंट साठी सि. टी. स्कॅन सुविधा  मोफत असणार आहे. तर बाहेरच्या दवाखान्यातुन येणाऱ्या पेशंट साठी ही सेवा अल्प दरात असणार आहे. मागील काही महिन्यापूर्वी तुळजापूरचे सि टी स्कॅन हे इतर ठिकाणी स्थलांतर होणार अशी माहिती आली होती. त्या अनुषंगाने आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी तात्काळ आरोग्य मंत्री आणि संबंधित मंत्री संचालक यांना बोलून हे ते रद्द केले होते. सि. टी. स्कॅनच्या सर्व कामा वरती रुग्णालय अधीक्षक डॉ. चोरमले लक्ष देत आहेत. आता लवकरच म्हणजे जुलै च्या पहिल्या आठवडा मधेच हे सि. टी. स्कॅन सर्वांसाठी तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय येथे उपलब्ध असेल.अशी माहीती आनंद कंदले सदस्य रुग्ण कल्याण समिती उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर यांनी दिली. 


 
Top