भूम (प्रतिनिधी)-कोल्हापूर येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने वैद्यकीय सन्मान सोहळा आणि पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र शिवसेना वैद्यकीय कक्ष संपर्कप्रमुख साई संजीवनी हॉस्पिटल चे संचालक सचिन मांजरे पाटील व जिल्हाप्रमुख पांडुरंग धस यांचे रुग्णसेवेत भरीव योगदान समाजातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना वैद्यकीय कक्ष जिल्हाप्रमुख पांडुरंग धस यांचे मोलाचे योगदान आहे.धाराशिव जिल्ह्यातील शेकडो गरजवंतांना मुख्यमंत्री सहायता निधी मिळाल्याने मोठा आधार दिला आहे. या रुग्णसेवेची दखल घेऊन यांचा रुग्णसेवेचा कार्याबद्दल विशेष रुग्णसेवा सन्मान माजी आमदार शहाजी बापू पाटील,आमदार राजेश क्षीरसागर, उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षप्रमुख मंगेश चिवटे या मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह व कृतज्ञता पत्र देऊन करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्य नेते, एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री तथा पालकमंत्री धाराशिव प्रताप सरनाईक, आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षप्रमुख मंगेश चिवटे, शिवसेना सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते,यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ हिरक 60 आरोग्य वर्ष अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील जनतेचा सुदृढ आरोग्यासाठी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील शासकीय विविध योजना, मुख्यमंत्री सहायता निधी,महात्मा फुले जन आरोग्य योजना, उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष,तसेच शिवसेना वैद्यकीय कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करून जिल्ह्यातील शेवटच्या घटकातील गरजू रुग्णापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणार असे प्रतिपादन संपर्कप्रमुख सचिन मांजरे व जिल्हाप्रमुख पांडुरंग धस यांनी केले.
याप्रसंगी, शिवसेना प्रवक्ता ज्योती वाघमारे, आमदार सुजित मिणचेकर, वैद्यकीय मदत कक्ष कार्याध्यक्ष रामहरी राऊत, पिंटू पाटील, गणेश चिवटे, सोलापूर जिल्हाप्रमुख सुरज जम्मा, जिल्हा समन्व्यक रवि गुडे, प्रशांत नाईकवाडी,व सर्व पदाधिकारी तसेच सर्व आरोग्यदूत उपस्थित होते.