कळंब (प्रतिनिधी)- येथील बस आगार प्रशासना मार्फत रा. प. महामंडळाच्या  कळंब  बस स्थानकावर एस. टी. चा 77 वा वर्धापन दिन दि. 1 जून रोजी सकाळी फीत कापून व ज्येष्ठ नागरिकांच्या हातून केक कापून आणि  प्रवाशांन गुलाब फुले आणि मीठाई  वाटून साजरा करण्यात आला ,या वेळी बस स्थानकावर रांगोळी ,केळीचे पाणे ,तोरण बाधून स्थानक सजवण्यात आले होते ,या वेळी प्रवाशांना गुलाब फुल देऊन स्वागत केले तर मीठाई वाटून आनंदोत्स साजरा केला ,प्रवाशा बरोबरच वाहक चालक यांचा सत्कार ही या वेळी केला .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख एस डी खताळ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव चे यंत्र अभियंता सूर्यकांत थोरबोले , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे; कार्यशाळा अधीक्षक बालाजी भारती हे होते तर  वाहतूक निरीक्षक निलेश जाधव  हे होत ,या वेळी

या कार्यक्रमासा प्रमुख अतिथी म्हणून कळबं तालुका मराठी प्रत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुळीक  व कळंब आगारातील सर्व पर्यवेक्षक व कर्मचारी यांची उपस्थिती होती. तसेच प्रवाशांना साखर व पेढे वाटण्यात आले.या कार्यक्रमासाठी कार्यशाळा   सहाय्यक वाहतूक निरीक्षक अभिजीत धाकतोडे, प्रभाकर झांबरे , लखन कांबळे, अभिजिन गायकवाड , रामलिंग जाधवर  .वाहतुक नियंत्रक सुशिल हुंबे,चेतन गोसावी, प्रशांत नानजकर , हनुमंत मुंडे ; वाहक एस . आर.  जगताप . विलास जाधव ,अभिजीत गायकवाड, ज्योतीराम तौर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गणेश गोरे यांनी केले तर महिला कर्मचाऱ्यांमध्ये श्रीमती अलका भोसले , प्रियंका शिंदे, तरमिम शेख, अश्विनी तिडके,वंदना पालके,संध्या कुमठेकर; राजकन्या गवळी  सह आदी नी पारिश्र घेऊन एसटीचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला.

 
Top