परंडा (प्रतिनिधी)- शहरातील महाराणा प्रतापसिंह चौकात शुक्रवारी दि.९ मे रोजी सायंकाळी महाराणा प्रतापसिंह प्रतिष्ठाणच्या वतीने वीर शिरोमणी मेवाड रत्न महाराणा प्रतापसिंह यांची ४८६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी मा.आ.सुजितसिंह ठाकूर आणि मा. नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल यांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंह यांच्या भव्य मुर्तीचे पुजन तसेच पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी मा नगराध्यक्ष रमेशसिंह परदेशी, हिंदु वॉरियर्सचे संस्थापक धिरजसिंह ठाकूर, निवृत्त मेजर अरुणसिंह ठाकूर, रविंद्र मिश्रा, सचिनसिंह ठाकूर, मनोजसिंह ठाकूर, किरणसिंह ठाकूर, विक्रम मिश्रा, अँड. गोविंद कोटुळे, सत्यजितसिंह सद्दीवाल, लक्ष्मण गोरे, विशाल काशीद, समरजितसिंह ठाकूर, मदनसिंह सद्दीवाल, मदन दिक्षीत, ॲड. पृथ्वीराजसिंह सद्दीवाल, कुणाल जाधव, राहुलसिंह सद्दीवाल, संकेतसिंह ठाकूर, आशिषसिंह ठाकूर, सुधिरसिंह चौहाण, बल्ली ठाकूर, किरण पांडे, अमरसिंह ठाकूर, बंटी ठाकूर, ओंकार तबेलदार, आदर्शसिंह ठाकूर, यशसिंह परदेशी, हिंदु वॉरियर्स चे अध्यक्ष उमेश घाडगे, विकास साळुंके, मोहन दिक्षीत, चिया दिक्षीत पावन मिश्रा, संकेत शुक्ला, सुरजसिंह ठाकूर, अजय पांडे, तुषार पांडे, राज वळसंगकर, संग्या ठाकूर, रोहीत जाधव, यशसिंह ठाकूर, समाधान कोळेकर, विर मिश्रा, कार्तीक दिक्षीत, आनंद मोहिते, ओंकार काशीद आदी उपस्थीत होते.

 
Top