कळंब (प्रतिनिधी)- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव 2025 निमित्त आयोजित केलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या यशवंतांचा गौरव सोहळा गुरुवार दि 29 मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, मुंबई आणि फ्रेंड्स फॉरेव्हर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. 

शहरातील व तालुक्यातील जवळ पास 22 शाळांमधून 2200 विद्यार्थी सहभागी झाले होते. चित्रकला लहान गटात प्रथम पारितोषिक आधिश्वरी स्वामी, द्वितीय क्रमांक समर्थ पवार तर तृतीय रेणुका पानढवळे हिने पटकावले. उत्तेजनार्थ प्रणव डिकले, उमर तांबोळी, वैदेही लोंढे, वैभवी वाघमोडे, अक्षय गिरी, प्रिया साखरे, भक्ती सलगर यांना मिळाले.  चित्रकलेच्या मोठ्या गटात प्रथम क्रमांकाचे अभिराज वाघमारे, द्वितीय क्रमांकाचे समृद्धी माळी तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस जान्हवी सोनवणे हिला मिळाले. उत्तेजनार्थ श्रेयश चोंदे, शिवम पोते, पृथ्वीराज पिंगळे, बतुल शेख, श्वेता कांबळे, प्रांजली झाडे, अक्षरा काळे यांना मिळाले. निबंध स्पर्धेत प्रथम बक्षीस वैदेही जोशी, द्वितीय बक्षीस शारदा जाधव तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस यश कदम याला मिळाले. उत्तेजनार्थ बक्षीस सुहाना बेग, अंकिता घाटूळे, देवी मुंडे, सृष्टी इंगोले यांना मिळाले.  


यांचाही विशेष सत्कार

यावेळी आसावरी गोसावी व कृष्णा आडसुळ, मॉडेल इंग्लिश स्कूल, राजनंदीनी दत्ता पवार, वसुंधरा मुकुंद नांगरे, डॉ. रामकृष्ण लोंढे, श्रीधर भवर व प्रविण शिंदे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवींचे स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे प्रा सोमनाथ लांडगे आणि शिव व्याख्याते खराटे यांनी अहिल्यादेवींच्या जिवनावर सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप संतोष घाटूळे यांनी केला. सुत्रसंचालन अशोक शिंपले यांनी केले. तर आभार प्रदर्शन नानासाहेब कवडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी फ्रेंड्स फॉरेव्हर ग्रुपचे अध्यक्ष अतुल कवडे, सचिव डॉ अभिजित लोंढे, गोपाळ उबाळे, शंकरचंद्र खंडागळे, परमेश्वर मोरे, पिंटू कसपटे, प्रबोधन मंचाचे डॉ रामकृष्ण लोंढे, नानासाहेब कवडे, संतोष घाटूळे, अजीत गायके, झेलम शिंपले, सचिन सलगर यांनी परिश्रम घेतले.       

 
Top