धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील व परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची बैठक सांजा रोड येथील जत्रा फंक्शन हॉल या ठिकाणी होऊन अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दी निमित्त होणाऱ्या जयंतीसाठी धाराशिव शहरात मोठ्या प्रमाणात नियोजन आले. यावेळेस ही जयंती सर्वसमावेशक करून महिलांचा या जयंती मध्ये सहभाग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. या जयंती मध्ये विविध प्रकारचे देखावे व पारंपारिक पद्धतीने मिरवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये यावर्षीची नवीन कार्यकारणी निवडण्यात आली त्यामध्ये उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून श्री लिंबराज डुकरे यांच्या नावाला सर्वांनी एकमुखाने पाठिंबा दिला. अध्यक्षच्या निवडी सोबतच नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. नवीन अध्यक्ष व कार्यकारिणीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या यावेळी समाजातील प्रमुख कार्यकर्ते प्रा. सोमनाथ लांडगे राजाभाऊ वैद्य मुकुंद घुले इंद्रजीत देवकते राहुल काकडे गणेश सोनटक्के अशोक गाडेकर समाधान पडुळकर नरसिग मेटकरी अमोल मैदाड आण्णा मैदाड बालाजी गडदे गणेश एडके श्याम तेरकर श्रीकांत तेरकर दादा मोठे शुभम नरोटे शरद शिंदे देवा काकडे नाना डुकरे विजय सोनटक्के दादा घोडके सचिन राठोड अमोल भोजने समाधान लहाडे नारायण चव्हाण आबा चौधरी प्रदीप तेरकर संतोष वतने रोहन गाढवे सुरेश शिंदे संदीप वाघमोडे ओमकार देवकते नवनाथ सोलंकर अरविंद देवकते यश देवकते कुणाल देवकते हे सर्व समाज बांधव कार्यक्रमाला उपस्थित होते.