तुळजापूर (प्रतिनिधी)-  येथील सृष्टी सुभाष शिंदे या सतरा वर्षिय तरुणीने लातूरच्या दयानंद काँलेज वसतीगृहात गुरुवार दि. 22 मे रोजी दुपारी छताला ओडणीने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. 

या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात  वर्गात एकच खळबळ उडाली आहे. या बाबतीत अधिक माहीती अशी की, तुळजापूर येथील सुभाष शिंदे यांची सतरा वर्षिय सृष्टी ही मुलगी दयानंद विज्ञान महाविद्यालयात यंदा बारावीला गेली होती. गुरुवार दि. 22 मे रोजी दुपारी याच महाविद्यालयाच्या वसतिगृहात छताला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद झाली.

 
Top