कळंब (प्रतिनिधी)- कळंब शहरात बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाच्या व फॅन्सी नंबर प्लेट आणि फटाका फोडणाऱ्या बुलेट गाड्यावर पोलीस निरीक्षकाने कारवाई करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट गाड्या जप्त करण्यात याव्यात अशी मागणी शहरातील नागरिकांतून जोर धरत आहे. कळंब शहरात गल्लीबोळातील रस्त्यावर बुलेट शौकीन चालकांनी मूळ गाड्यांमध्ये बदल करून कर्कश आवाज व फटाके फोडणारे सायलेन्सर लावून शहरांमध्ये उच्छाद मांडला आहे कळंब शहरातील रस्त्यावर अशा कर्णकर्कश आवाजाच्या बुलेट गाड्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे अनेकदा अशा गाड्यातून फटाक्याचे आवाज निघत असल्यामुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे .प्रसंगी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही . यात गंभीर प्रकारची दखल पोलीस निरीक्षक व त्यांच्या टीमने घेणार का? असा सवाल कळंबवासीयांनी केला आहे .मूळ बुलेट गाड्यांच्या सायलेन्सर मध्ये बदल करून आवाज करणारे सायलेन्सर असणारे सदर गाड्यांना लावण्यात आले आहेत .त्यामुळे रस्त्यावर या गाड्यांच्या कर्णकर्कश आवाज करत धावत असतात त्यामुळे वृद्ध नागरिक लहान मुले यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक पोलीस व प्रभारी पोलीस निरीक्षकांनी या गाड्यावर कारवाईचे धाडस दाखवणार का? असा सवाल जनतेतून होत आहे . याकडे पोलीस दलाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.