भूम (प्रतिनिधी)- धाराशिव येथे वंचित बहुजन आघाडी पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी संवाद मेळावा मंगळवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद नाट्यगृहामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. वंचित बहुजन आघाडी भूम तालुका नवीन कार्यकारणी निवड करण्यासाठी निवड समिती प्रमुख म्हणून मुकुंद लगाडे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख यांची ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आदेशित करून जबाबदारी दिली आहे.
या बैठकीला मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल, निरीक्षक अविनाश भोसीकर, जिल्हा महासचिव प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे, डॉ. प्रणित डिकले, रामभाऊ गायकवाड, जिल्हा संघटक दत्तात्रय शिंदे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख अनुराधा लोखंडे, नामदेव वाघमारे, विकास बनसोडे, सुधीर वाघमारे,बी.डी.शिंदे, ज्येष्ठ नेते मिलिंद रोकडे, समता सैनिक उपस्थित होते.
भूम तालुका कार्यकारणी निवड करण्यासाठी आदरणीय ॲड .आंबेडकर यांच्या आदेशानुसार गुरुवार दि. 29 मे 2025 रोजी येथील शासकीय विश्रामगृह पार्डी रोड भूम येथे निवड समितीच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार आहेत. तरी या निवडीसाठी वंचित बहुजन आघाडी भूम तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आव्हान करण्यात आले आहे.