तुळजापूर (प्रतिनिधी)-  राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरात भाविकांची वाढती गर्दी पाहता आणि अलीकडील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. देशभरातून हजारो भाविक दररोज श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी येथे येत असतात. त्यांच्या सुरक्षेसाठी मंदिर प्रशासनाने अधिक दक्षता घेतली आहे.

मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पर्स, बॅग व तत्सम वस्तू घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. भाविकांनी कोणतेही सामान मंदिर परिसरात आणू नये, असे स्पष्ट आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, मंदिरात प्रवेश करताना प्रत्येक भाविकाची मेटल डिटेक्टर व डोअर फ्रेम मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने कसून तपासणी करण्यात येत आहे. भाविकांनी संयम बाळगून सुरक्षाव्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top