परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील जिजाबाई केसकर यांच्या नवजात बालकाच्या आजारावरील उपचार भागविण्यासाठी उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय कक्ष जिल्हाप्रमुख पांडुरंग धस यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 50 हजार रुपये उपचारासाठी आर्थिक मदत मंजूर झाली.
केसकर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे हॉस्पिटलचा खर्च परवडणारा नव्हता. उपचार करणे आवश्यक आहे. वैभव केसकर यांनी जिल्हाप्रमुख पांडुरंग धस यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली. पांडुरंग धस यांनी तात्काळ सर्व कागदपत्रे मुख्यमंत्री सहायता निधी मुंबई ऑफिसला पाठवली. व सतत फाईल संदर्भात पाठपुरावा केला. यावेळी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, वैद्यकीय मदत अधिकारी रवींद्र अनभुले,संपर्क प्रमुख सचिन मांजरे यांच्या सहकार्याने महिलेच्या मदतीसाठी तत्काळ सूचना केल्याने या महिलेचा नवजात बालकास मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून पन्नास हजार रुपये मदत मंजूर झाली. याबाबतचे मंजुरी पत्र शिवसेना वैद्यकीय कक्ष जिल्हाप्रमुख पांडुरंग धस यांचा हस्ते नातेवाईकांकडे देण्यात आले.