धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरामध्ये सकल जैन समाजा तर्फे भ.महावीरांचा 2624 वा जन्म कल्याणक साजरा करण्यात आला.भ.महावीर जन्मकल्याणक उत्सवाची सुरुवात ध्वजारोहण करुन करण्यात आली.ध्वजारोहण धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सकल जैन समाजाचे अध्यक्ष उल्हास चाकवते यांनी केले.मान्यवरांचे स्वागत अमित गांधी,प्रशांत येणेगूरे,मनोज कोचेटा,डॉ संदेश गांधी,मनोज चाकवते,अतुल कांबळे यांनी केले.
खासदार ओमप्रकाश निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी शुभेच्छा पर भाषण केले व भ.महविरांच्या संदेशाचे- सत्य अहिंसा अचोर्य अपरिग्रह ब्रह्मचर्य चे पालन केल्यास खरोखरच विश्व शांती निर्माण होईल. अहिंसा परमो धर्म व जियो और जिने दो च्या संदेशाने समाजा समाजा मध्ये एकोपा निर्माण होईल व सर्व जिवांची रक्षा होईल.यानंतर शोभायात्रा चे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रम मंचावर शांतीलाल कोचेटा,राजाभाऊ जगधने, प्रविण बोपलकर, कुणाल गांधी, सुदेश फडकुले, नगरसेवक बाळासाहेब काकडे,तुषार निंबाळकर, प्रदिप मुंडे, पंकज पाटील इत्यादी मान्यवर उपस्थीत होते. शोभायात्रा माऊली चौक,मारवाडी गल्ली,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,छ.शिवाजी महाराज चौक,नगर वाचनालय व माऊली चौकात विसर्जन झाले.श्री 1008 पार्श्वनाथ सै दिगंबर जैन मंदीर व श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदीर येथे पंचामृत आभिषेक शांतीधारा,पूजन करण्यात आले. भ.महावीर यांची माता होण्याचा मान श्वेता वर्धमान दुरूगकर व आत्या होण्याचा मान श्रुती वर्धमान दुरूगकर तुळजापूर निवासी यांना मिळाला. महाप्रसदाचा कार्यक्रम बालाजी मंदीर येथे झाला.संध्याकाळी पाळणा व संसकृतीक कार्याक्रम झाले.