धाराशिव (प्रतिनिधी)- पर्यटन जनजागृती संस्था धाराशिव संचलित पर्यटन विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने महामानवाचा जयंती महोत्सवात सहभागी होऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आकर्षक अशा देखाव्याची पाहणी केली.
गणेश वाघमारे यांनी देखाव्याविषयी माहिती दिली,विद्यापीठ कमान,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म वेळची कुटी,महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह,भारताचा कोहिनूर हिरा,दिक्षा भुमी,तथागत गौतम बुद्ध यांची सुंदर अशी भुमी स्पर्श मुर्ती,शितल छाया देणा-या चंद्रातील तथागत गौतम बुध्द अशा देखाव्याचे सादरीकरण पाहतांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा संस्थेचे मार्गदर्शक डॉ अभय शहापुरकर यांनी दिला तर महाडचा चवदार पाण्याचा सत्याग्रह हा मानवाच्या न्याय हक्कांसाठीचा लढा होता असे मत व्यक्त केले.फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे स्वागत शाल व गुलाबपुष्प देऊन केले.यावेळी पर्यटन जनजागृती संस्था धाराशिव संचलित फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीचे अध्यक्ष युवराज नळे,मार्गदर्शक डॉ. अभय शहापुरकर,सचिव देविदास पाठक,कार्याध्यक्ष रणजित रणदिवे,कोषाध्यक्ष बाबासाहेब गुळीग अन्य इतर उपस्थित होते.तर फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीचे गणेश वाघमारे, अंकुश उबाळे,संजय गजधने, प्रविण जगताप,रमेश कांबळे, बलभीम कांबळे,संपतराव शिंदे, अतुल लष्करे स्वराज जानराव विशाल घरबुडवे सह इतर उपस्थित होते.