धाराशिव (प्रतिनिधी)-  जागतिक आरोग्य दिनानिमित्त 7 एप्रिल 2025 रोजी मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्याला सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वाधिक 6 पुरस्कार मिळणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्याने सातत्याने उत्तम आरोग्य सेवा आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांत उल्लेखनीय योगदान दिल्यामुळे जिल्ह्याला 6 पुरस्कार मिळाले आहेत. 


या कामासाठी मिळाले सहा पुरस्कार

यामध्ये बालमृत्यू कमी करणारा जिल्हा प्रथम पुरस्कार, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यक्षमता मुल्यांकन द्वितीय पुरस्कार, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम  द्वितीय पुरस्कार, गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम  द्वितीय पुरस्कार, राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम  द्वितीय पुरस्कार, सर्वाधिक रुग्णालयीन प्रसूती करणारे शासकीय रुग्णालय द्वितीय पुरस्कार या प्रमाणे मिळाले आहेत. धाराशिव जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, नतून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी जागृतपणे काम केल्यामुळे हे पुरस्कार मिळाल्याचे मानले जात आहे.


 
Top