धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा  कार्यालयात ( दि. 29) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष महेंद्र  धुरगुडे यांच्या हस्ते आणि  प्रदेश संघटक सचिव खलील पठाण,  सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अतुल जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवनियुक्त ज्येष्ठ नागरिक सेल जिल्हाध्यक्ष कमलाकर घुटे यांना नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय व कर्तबगार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रीय नेतृत्वावर तसेच  जिल्हाध्यक्ष महेंद्र  धुरगुडे यांचे धाराशिव जिल्ह्यातील नेतृत्वावर विश्वास ठेवीत ज्येष्ठ नागरिक सेल जिल्हा अध्यक्ष पदी कमलाकर भानुदासराव घुटे पाटील  यांनी  पदाची जबाबदारी स्वीकारली. 

यापुढे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे व पक्षातील ज्येष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक,सामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे,पक्ष संघटन मजबूत करणे व पक्ष वाढीसाठी जिल्ह्या व तालुकामध्ये प्रयत्न करणार व दिलेल्या संधीचे सोने करू असे त्यांनी पद नियुक्ती नंतर सांगितले. निवड झाल्याबाबतचे  नियुक्तीपत्र देऊन नवनियुक्त ज्येष्ठ नागरिक सेल जिल्हाध्यक्ष कमलाकर घुटे यांचा पुष्पगुच्छ देऊन  सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच नवनियुक्त ज्येष्ठ नागरिक सेल जिल्हाध्यक्ष कमलाकर गोटे व उपस्थित पदाधिकारी यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धूर गुडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी  जिल्हा उपाध्यक्ष बालाजी वगरे, सेवा दल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव, धाराशिव युवक तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे,सामाजिक न्याय जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ जानराव, धाराशिव अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अराफत काझी, धाराशिव तालुका सचिव विनोद अवतारे, अण्णा बंडगर, तानाजी काकडे,वसंत कांबळे,रामचंद्र बचाटे, राजेंद्र कसबे, पांडुरंग कांबळे, पंढरी देठे, प्रकाश जाधव, शिवप्रसाद देठे, मंगेश गोटे, अनिकेत गव्हाड, नाना जाधव, प्रकाश जाधव पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.  


 
Top