धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील हॉटेल पुष्पक पार्क सभागृहात भारत सरकार भारतीय मानक ब्युरो शाखा पुर्ण कार्यालय व धाराशिव जिल्हा सराफ सुवर्णकार असोसिएशन फेडरेशन यांच्या संयुक्तपणे जिल्हा सर्व सराफ सुवर्णकार यांच्या साठी हॉलमार्क करुन आभुषणे विकणे, ग्राहकांच्या विश्वास पात्र होण्यासाठी जन जागृती कार्यक्रम आयोजित केला होता.
भारतीय मानक ब्युरोचे प्रमुख व निदेशक एस.डी. राणे, उपनिदेशक निखील चंद्रात्रे, सराफ संघटना जिल्हाध्यक्ष कपिल शर्मा, शहराध्यक्ष रामदास वंजारी, जिल्हाकार्याध्यक्ष अंकुर अजित नाईक, माजी जिल्हाध्यक्ष संजय गणेश, जिल्हा निवड समिती अध्यक्ष मल्हारी ओमासे यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. त्यानंतर भारतीय मानक ब्युरोचे उपनि देशक यांनी उत्पादन, हॉलमार्क, नोंदणी या बाबत सविस्तर विषय संगणकीय पद्धतीने विशेद केला. उपस्थित सराफांच्या प्रश्नांची, शंकेचे निरसण प्रमुख निदेशक एस.डी.राणे यांनी समाधानकारक उत्तरे दिवून शंकेचे निरसण केले. या हॉलमार्क जण जागृती कार्यक्रमासाठी तुळजापुर, बेंबळी, येरमाळा, येडशी, उमरगा जिल्हाभरातून सराफ व्यापारी यांना उपयुक्त ठरले. सदर कार्यक्रमासाठी सराफ संघटना जिल्हा कोषाध्यक्ष राजन नायगावकर, तालुकाध्यक्ष संताजी मुंडे, भागवत पोतदार, गणेश नायगावकर, विनय विष्णूदास सारडा, व्यंकटेश ओमासे, संघटना पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन कलाध्यापक शेषनाथ वाघ यांनी केले. तर आभार कपिल शर्मा यांनी मानले.