तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे गुरुपौर्णिमा निमित्ताने धनगर समाज बांधवांनी दि. 21 जुलैला परज मिरवणूक काढली.                                    

धाराशिव तालुक्यातील तेर येथील गणपती चौकातून परज मिरवणुकीस प्रारंभ होऊन परज मिरवणूक श्री विठ्ठल बिरूदेव मंदिरापर्यंत काढण्यात आली.यावेळी भागवत भक्ते, फुलचंद पसारे, तानाजी पसारे, अंबत्रुषी भक्ते, दत्ता भक्ते, नाना भक्ते, खंडू शिलगिरे, हनुमंत पसारे, हरि भक्ते, दादा पसारे, मच्छिंद्र भक्ते, विजय वैद्य, शरद एडके, शामराव गायके, नानासाहेब गायके, नवनाथ पसारे व मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव सहभागी झाले होते. महाप्रसादाने मिरवणुकीची सांगता झाली.

 
Top