धाराशिव (प्रतिनिधी)- मागील दोन वर्षाखाली शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे दर 11 हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे होते. परंतु सदर दर वृद्धी होताच भाजपा प्रणित सरकारने सोयाबीन, सोया पेंड, व सोयाबीन तेलावरील आयात शुल्क कमी करून सोयाबीनचे देशांतर्गत भाव पाडून 4 हजार प्रती क्विंटलवर आणून ठेवले आहे. लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी  तुळजापूर तालुक्यातील सावरगाव काटी व अन्य गावातील गावभेट दौऱ्यात शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारला हद्दपार करा असे प्रतिपादन केले.

शेतकऱ्यांच्या शेतीवर आधारित उत्पन्नाचे दर पाडण्याचा भाजप सरकारने सपाटाच लावला. सध्या गाईच्या दुधाला बावीस रुपये प्रति लिटर दर मिळत असून बाटली बंद पाणी वीस रुपये प्रति लिटर प्रमाणे बाजारात विकले जाते. हे विदारक सत्य जनतेच्या समोर प्रचार सभेच्या दरम्यान मांडले. टोमॅटोचे दर वाढल्यानंतर आयात करुन शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे दर कमी केले. याच बरोबर शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर वाढत असताना लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्यात शुल्कात वाढ केली. यावेळी शेती मालाच्या भाव पाडल्यामुळे ओम राजेनिंबाळकर यांनी घणाघाती हल्ला केला. यावेळी रामचंद्र आलुरे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर, अशोक जगदाळे, मुकुंद  डोंगरे, अभिजीत चव्हाण, ऋषी मगर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, तालुकप्रमुख जगन्नाथ गवळी, संजय भोसले, रामेश्वर तोडकरी, सुनिल जाधव, प्रदिप मगर, सुजीत हंगरगेकर, जितेंद्र कानाडे, गौरीशंकर कोडगिरे, राजकुमार बोबडे, श्वेता ताई दुरुगकर, संगिताताई काळे, तुळशीराम बोबडे, शाम पवार यांच्यासह उपस्थित होते.


 
Top