धाराशिव (प्रतिनिधी)-श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेले केशेगावचे सुपुत्र प्रा.मनोज डोलारे यांना नुकतेच पुणे येथे 6व्या ग्लोबल पदवीदान समारंभात पक्षीसंवर्धनातील योगदानाबद्दल गांधी पीस फाऊंडेशनच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी देवून सन्मानित करण्यात आले.

मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल प्रा.डोलारे यांचा सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय केशेगाव येथे सरपंच अभिजीत पाटील व उपसरपंच बालाजी शिंदे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभास भाजपा कार्यकारिणी सदस्य भारत डोलारे, विनोद पाटील, रामेश्वर शिंदे, रंगनाथ कोळगे, अरुण कोळगे, प्रभुलिंग वाघाळे, सज्जन कोळगे, तानाजी डोलारे, महेश चांदणे, गणेश कोळगे, अमोल नवले, रंगनाथ चव्हाण, ज्ञानेश्वर डोंगरे, भगवंत जाधव, महादेव शिंदे, गणपत कोळगे, शाहूराज माळी, मारुती कोळगे, हणमंत काळे, सोमनाथ वाघाळे, हरी वाघे, शाम कोळगे, रामा कोळगे, बाबा कोळगे, दशरथ माने, बळी क्षीरसागर, लिंबा वाघे, नामदेव मगर, भारत गवळी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी पर्यावरण संतुलन राखावे तसेच वन्यजीवांचे संरक्षण करावे असे आवाहन प्रा.डॉ.मनोज डोलारे यांनी ग्रामस्थांना केले.


 
Top