तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील मसलाखुर्द येथे सांडपाणी नाल्या पाण्याने भरल्याने व जलजीवन पाईप लाईन टाकण्यासाठी खोदलेल्या चरीची व्यवस्थित दबाई न केल्याने अर्धा गावात रस्त्यावर पाणी थांबत असल्याने रोगराई पसरण्याची शक्यता झाली आहे.

मसलाखुर्द येथे जुन्या नाल्या कच-याने भरल्या आहेत.तसेच  जलजीवन पाणीपुरवठा योजना मंजुर असुन हे काम गेली अनेक महिन्या पासुन चालु आहे. जलजीवन चेखोदलेल्या चरीमध्ये  पाईप अंथरली पण त्याची  व्यवस्थित दबाई न झाल्याने यास पाणी अडकुन ते रस्त्यावर पसरत आहे. अशी परिस्थिती अर्धा गावात आहे. या कामामुळे अर्धा गावात पाणी वितरण व्यवस्थित होत नाही. तरी ग्रामपंचायत ने स्वछतेकडे लक्ष देवुन पाणी निस्सारण अर्धा गावात पाणीपुरवठा  करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.


 
Top