तुळजापूर (प्रतिनिधी)-तेलंगणा सरकार शेतकर्यांसाठी विविध योजना आणून शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहिले. असा प्रयोग महाराष्ट्रात का होत नाही? असा प्रश्न उपस्थित करून राज्यातील नेत्यांनी तेलंगणा सरकारचा आदर्श घ्यावा असे अवाहन मराठा सोयरीक चे सुनील जवंजाळ पाटील यांनी केले आहे. नुकतीच त्यांनी हैदराबाद येथे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तेलंगणामध्ये मराठा मेळावा घेण्यासाठी अनुकूल प्रतिसाद दर्शविला आहे.
तेलंगणा सरकार यांनी तिथे शेतकरी हिताची खूप कामे केली आहेत. 2014 साली हे राज्य अलग झाले. अवघ्या दोन पंचवार्षिक मध्ये तिथे आमुलाग्र बदल मुख्यमंत्री के सी आर यांनी घडवून आणला आहे. हा विकास पाहण्यासाठी जिल्ह्यातील पत्रकार व शेतकरी यांना तेलंगणा सरकारने निमंत्रित केले होते. त्यात मराठा सोयरीकचे सुनील जवंजाळ पाटील सहभागी झाले.
तेलंगणा व आंध्र प्रदेशामध्ये जवळपास 20 ते 22 लाख मराठा कुटुंब वास्तव्यास आहेत. या ठिकाणी मराठा मेळावा घेण्याविषयी मुख्यमंत्री के सी आर व सुनील जवंजाळ यांनी वीस मिनिटे चर्चा केली. या बाबत मुख्यमंत्री यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. त्याद्वारे केवळ महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात सोयरीक करताना जी मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत कमी आहेसं जाणवत होतं ती उणीव भरून निघण्याला संधी आहे. महाराष्ट्रातील नेत्यानी केसीआर यांच्या सारखे शेतकरी हिताचे धोरण राबवल्यास शेतकरी आत्महत्या बंद होतील असेही सांगितले.