उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 केंद्रीय सैनिक बोर्ड ,रक्षा मंत्रालय,भारत सरकार,नवी दिल्ली यांचेकडील दि.18 ऑक्टोबर 2022 च्या आदेशानुसार,शैक्षणिक वर्ष 2021-22 करीता वर्ग 1 ली ते 9 वी आणि 11 वी साठी शैक्षणिक आर्थिक मदत मिळणेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची  अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

  जिल्हयातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या विधवा यांना पुन्हा माहिती देण्यात येत आहे की त्यांचे पात्र पाल्यांचे अर्ज www.ksb.gov.in या वेबसाइटवर भरून त्याची प्रिंट प्रत (printed copy) तात्काळ कार्यालयात सादर करावी असे आवाहन मेजर मिलिंद तुंगार (नि), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,उस्मानाबाद यांनी केले आहे.


 
Top