उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्‍ट्रीय अन्‍नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत सवलतीच्‍या दराने अन्‍नधान्‍य देण्‍याकरीता शासनावर येणारा आर्थिक भार कमी होण्‍यांच्‍या दृष्‍टीने तसेच योग्‍य व गरजु लाभार्थ्‍यांना सवलतीच्‍या दराने अन्‍नधान्‍यांचा लाभ मिळावा.या उदिष्‍टासाठी “अनुदानातुन बाहेर पडा” (Otp Out of Subsity) ही योजना सुरु करण्‍यांचा निर्णय अन्‍न व नागरी पुरवठा विभागाने  घेतला  आहे. जर राष्‍ट्रीय अन्‍नसुरक्षा योजनेमध्‍ये सवलतीच्‍या दराने अन्‍नधान्‍याचा लाभ मिळण्‍याकरीता पात्र असलेल्‍या लाभार्थ्‍यांना जर त्‍यांना सवलतीच्‍या दराने लाभ घेण्‍यांची आवश्‍यकता नसेल तर सवलतीच्‍या दराने मिळणारे अन्‍नधान्‍य नाकारण्‍याचा पर्याय उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी “अनुदानातुन बाहेर पडा”(Give it up)  ही योजना कार्यान्वित करण्‍यात येत आहे.

 राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा 2013 अंतर्गत पात्र असलेल्‍या लाभार्थ्‍यांना सवलतीच्‍या दराने मिळणा-या अन्‍नधान्‍याचा लाभ घ्‍यावयांचा नसल्‍यास व देशास बळकट करण्‍यांच्‍या प्रक्रियेचा एक भाग होण्‍याकरीता म्‍हणून ज्‍या शिधापत्रिकांधारकांचे उत्‍पन्‍न वाढलेले असल्‍यास ( ग्रामीण भाग-44000/- पेक्षा जास्‍त व शहरी भाग 59000/- पेक्षा जास्‍त), कुटूंबातील सदस्‍य शासकीय, निमशासकीय सेवेत असल्‍यास, कुटूंबामध्‍ये 4 चाकी वाहन किंवा ट्रक, ट्रॅक्‍टर असल्‍यास, कुटूंबामध्‍ये 5 एकर पेक्षा जास्‍त जमीन असल्‍यास, आयकर भरणारे तसेच शिधापत्रीकाधारकांचे घर पक्‍के, RCC बांधकाम असल्‍यास वरीलपैकी कोणत्‍याही निकषामध्‍ये बसत असणा-या लाभार्थ्‍यांनी स्‍वेच्‍छेने लाभ सोडावा जेणे करुन वंचित राहिलेल्‍या गरजू लाभार्थ्‍यांना याचा लाभ घेता येईल. तसेच दिनांक 01 सप्‍टेंबर 2022 पासून शिधापत्रीका पडताळणी मोहिम तलाठी व मंडळ अधिकारी यांचे मार्फत राबविण्‍यात येणार आहे तेंव्‍हा जे वरील निकषात बसणारे लाभार्थी स्‍वेच्‍छेने लाभ सोडणार नाहीत अशा लाभार्थ्‍यांचे धान्‍य बंद करुन आजपर्यंत घेतलेल्‍या धान्‍याची वसुली बाजारभावाप्रमाणे करण्‍यात येईल  व शासनाची फसवणुक केल्‍याबद्दल कार्यवाही करण्‍यात येईल याची सर्व लाभार्थ्‍यांनी नोंद घ्‍यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्‍यात येत आहे.


 
Top