उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आणि त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक 1 मधील महिलांनी वंचित बहुजन महिला आघाडीच्या  महिला जिल्हा संघटक  अनुराधा सचिन लोखंडे यांच्या पुढाकाराने विविध उपक्रम राबविण्यात आले. प्रथम ध्वजारोहण करण्यात आले.  त्यानंतर   वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात अनेक महिलांनी  उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

  यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, रुक्मीणी  बनसोडे ,सुरेखा  गंगावणे,लक्ष्मी  गायकवाड,देशमुख, वाघमारे  ,सारिका   धावारे,संगीता   वाघमारे,रतन लोंढे,सिंधू लोंढे,कांचन वाघमारे,कमल बनसोडे,नंदा खांडेकर,शारदा वाघमारे आदी उपस्थित होते.


 
Top