उस्मानाबाद /प्रतिनिधी - 

 तुळजापूर सोलापूर रस्त्यावर सांगवीमार्डी जवळ स्कुटीवरुन गावावरुन गावाकडे जाणाऱ्या ज्ञानेश्वर नाना करांडे याचा   त्याचाच नातेवाईकाने चालत्या गाडीवरुन कत्तीने वार केल्याने यात तो  जागीच  ठार झाल्याची घटना घडली .सदरील खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.  

या घटने बाबतीत अधिक माहीती अशी कि खुन झालेला ज्ञानेश्वर नाना करांडे रामसला खुर्द ( ता तुळजापूर )येथील रहिवासी असुन त्याचे तुळजापूर येथे झेराँक्स चे दुकान आहे.सांयकाळी दुकान बंद करुन स्कुटीवरुन आपल्या  मसला या आपल्या गावाकडे जात आसताना त्याचाच मागावर असणाऱ्या त्याचाच नातेवाईकाने   सांगवीमार्डी जवळ आला चालता गाडीवरुन ज्ञानेश्वर वर कत्तीने वार केला असता तो खाली कोसळला व ठार झाला .

 
Top