उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यात दि. 19 फेब्रुवारी 2022 रोजी शिवजयंती उत्सव(शासकीय) साजरा होत आहे, त्या निमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.या दिवशी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे म्हणून मुंबई दारूबंदी कायदा 1949 मधील कलम 142 एक अन्वये जिल्ह्यातील सर्व देशी-विदेशी एफएल/बीआर परवाना कक्ष अनुज्ञप्ती दि. 19 फेब्रुवारी 2022 रोजी बंद ठेवण्याचे आणि त्यावरील मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.


 
Top