उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथील सांजा रोड परिसरात अवैध गौण खनिज वाहतूक नियंत्रण पथकाने 29 ब्रास वाळू आणि 96 ब्रास क्रॅश सँड साठा जप्त केला आहे. वाळूसाठा जाहिर लिलाव करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आली आहे.

  तहसील कार्यालय परिसर येथे 12 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. लिलावामध्ये ब्रास वाळू व क्रश सँड करीता रु. 3199 प्रतीब्रास या दराने  तीन लाख 99 हजार 875 रुपये  (अक्षरी तीन लक्ष नव्‍व्‍यान्‍नव हजार आठशे पंच्‍याहत्‍तर रुपये मात्र) एवढी हातची किंमत धरुन उक्त ठिकाणी जाहीर लिलावाव्दारे विक्री करणे आहे. तसेच लिलावाच्या सर्वोच्च बोलीच्या रक्कमेवर 10 टक्के अतिरिक्त रक्कम जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी म्हणून लिलावधारकाकडून शासनजमा करणे बंधनकारक राहील .

 याबाबत कोणत्याही प्रकारचा हितसंबंध, हक्क असणाऱ्या व्यक्तीचा लिलावास असल्यास दि.08 ऑक्टोंबर-2021 आत लेखी स्वरुपात तहसील कार्यालय उस्मानाबाद येथे कागदोपत्री पुराव्यासह सादर करावा.

 विहीत मुदतीत कुणाचा आक्षेप किंवा तक्रार  प्राप्त न झाल्यास सदरच्या लिलावास कुणाचाही आक्षेप नाही असे समजण्यात येऊन नियमाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसेच विहीत मुदतीनंतर आलेले आक्षेप,उजर,तक्रार इत्यादी विचारात घेतले जाणार नाही.   याची नोंद घ्यावी. इच्छुक जनतेनी लिलावामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार गणेश माळी यांनी केले आहे.

 
Top